प्रज्ञानानंद स्वामी अल्प परिचय  image
जन्म :- १५ मे १८९३, कोकणात आजोळी.
नाव :- दत्तात्रय नारायण कर्वे
आईचे नाव :- सौ. गंगाबाई नारायण कर्वे
वडील :- श्री. नारायणराव कर्वे (कीर्तनकार)
शिक्षण :- बी.ए. (संस्कृत) एस.टी. सी., पेशा - शिक्षक


१९९५ :- विवाह : कु. द्वारका जोशीची सौ. कमल दत्तात्रय कर्वे झाली
१९२९ :- पर्यंत आदर्श गृहस्थाश्रम
१९३० :- रावजीबुवा बिडवाडीकरांकडून 'राममंत्र' - 'श्रीराम जय राम जय जय राम' जप ४.५ कोटी पूर्ण
१९३० :- पासून ५-६ वर्षे तुलसीदास संप्रदायी गूढलिंगज्ञानी विरक्त बाबा गंगादासांचा सत्संग लाभ
२७/१/१९३४ :- बाबांच्या कृपेने निर्विकल्प समाधीचा सुंदर अनुभव व त्यांचे शुभाशीर्वाद ' श्री तुलसीजी तेरे मुखसे बोलेंगे' व 'जैसा है वैसा रहना, कुछ बनना मत' हा महावाक्योपदेश.
१/२/१९३७ :- शिक्षक नोकरीचा राजीनामा
१९३० ते १९४२ :- अखेरपर्यंत जप, अनुष्ठाने, एकांतिक साधना, तीर्थयात्रा, मानस पारायणे, प्रवचने इत्यादी.
१८/१/४३ :- प.पु. वासुदेवानंद सरस्वती स्वामी (पुणे - नाशिक रोडवरील आळे येथील पोटे स्वामी)कडून
संन्यास-दीक्षा.

१९४४ :- गुरुगीतेवर भाष्य 'गुरुगीता प्रबोधिनी'
१९५७ :- रामवन सतना रामायण - प्रवचनकार म्हणून संतसभेत आमंत्रण, तेव्हा जबलपूर - गोल बाजारातील दत्तमूर्तींची प्राणप्रतिष्ठा
१९४५ ते १९६६ :- पर्यंत अव्याहत लेखन श्रीराम चरीत मानस मराठी समवृत्त, मानसमणी व मानस-पियुष मधून भावलेखन व त्यानंतर प्रस्तावनेसह मानस गूढार्थ चंद्रिका हिंदी व मराठी भाष्यग्रंथ. हनुमान चालिसा मराठी अनुवाद, अभिनव रामायण, भूपाळ्या, आरत्या, काकडा आरत्या, पदे, अभंग,
वेदांतसार अभंग, रामायण इत्यादी स्फुट रचना व शेवटचा ग्रंथ ' मानवतापूर्ती साधन संध्योपासना'
पु. श्रीधरस्वामी, पु. गुळवणी महाराज, पु. दासगणु महाराज, पु.स्वरूपानंद स्वामी, पु. गोळवलकर गुरुजी या सर्वांशी स्वामींचा परिचय, पत्रव्यवहार, भेटीगाठी हि होत असत.
१९४३ ते १९६८ :- या काळात मानसाची अगणित पारायणे, प्रवचने व अनेक शिष्याना दीक्षा व मंत्र दिले.
१०/३ ते २३/३ :- प्रायोपवेशन ( अन्न पाणी त्याग आनंदाने करून )
२३/३/६८ :- रात्री १ वाजून १० मी. जीवन पुष्प श्रीराम चरणी समर्पित (महासमाधी)

I BUILT MY SITE FOR FREE USING